स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल
स्त्रीचे समाजात नेमके कोणते स्थान आहे? एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून तिचा समाजात दर्जा काय आहे? या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की सामाजिक व आर्थिक स्थित्यंतराशी आणि प्रस्थापित मूल्यव्यवस्थेच्या परिवर्तनाशी तो निगडीत आहे. प्रत्यक्ष समाजव्यवस्थेमधील सहभाग, सहभागाचे स्वरूप, स्वतःच्या भोवताली घडणाच्या घटना संबंधी निर्णय घेण्याची क्षमता व निर्णयाचे क्षेत्र …